05.01.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन परिषद संपन्न
05.01.2025 : मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथे आयोजित आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन परिषद राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. पुढारी समूहाच्या संपादक स्मीता योगेश जाधव, दैनिक लोकमतचे यदू जोशी, दै. सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, न्यूज १८ लोकमतचे संपादक विलास बढे यांना ‘संपादक व्रतस्त पुरस्कार’ देण्यात आले. विशेष पुरस्कार रुपेरी किनारच्या श्रीमती कल्पना जावडेकर, एड्यूटेकचे निलेश खेडेकर यांना देण्यात आले. यावेळी पुढारी समूहाचे अध्यक्ष योगेश जाधव, दैनिक लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, रुपेरी किनार फाउंडेशनच्या संस्थापक कल्पना जावडेकर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.