05.01.2020 : मार्डच्या वतीने राजभवन येथे राज्यातील निवासी डॉक्टरांचा करोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार
05.01.2020 : महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड)च्या वतीने राजभवन येथे राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा करोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर उपस्थित होते.