04.11.2022 : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यापालांमध्ये दोन्ही राज्यांची समन्वय बैठक संपन्न

04.11.2022 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत कोल्हापूर येथे दोन्ही राज्यांची समन्वय बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील सीमा भागातील पाच जिल्हे व कर्नाटक राज्यातील चार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती होती.