04.11.2020 : भामला फाउंडेशन संस्थे व्दारे आयोजित कार्यक्रमात करोना योद्ध्यांच्या सत्कार
04.11.2020: धारावी तसेच इतरत्र येथे करोना प्रकोपाच्या काळात समाजकार्य करणाऱ्या करोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. नानावटी रुग्णालयाचे डॉ समद अन्सारी, हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ सुजित चटर्जी, विजय कारिया, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कमल खुशलानी, विनीत गौतम, त्रिवनकुमार कर्नानी, रोमांचक अरोरा, निक्सन जोसफ, नेल्सन कोएल्हो, बैद्यनाथचे आयुर्वेदचे अध्यक्ष सिद्धेश शर्मा, आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नेहा जगतियानी, समाजसेवी एहसान गडावाला, अनुराग कत्रियार, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नागरे यांचा यावेळी करोना काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.