04.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते उत्तराखंडी भाषा संमेलन चर्चासत्राचे उदघाटन संपन्न
04.06.2022 : उत्तराखंडी भाषा संमेलनाच्या माध्यमातून राजभवन मुंबई येथे उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेवर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. चर्चासत्राला ज्येष्ठ साहित्यिक व भाषाविद डॉ बिहारीलाल जलंधरी, डॉ आशा रावत, डॉ नीलांबर पांडे, डॉ राजेश्वर उनियाल, ज्येष्ठ पत्रकार गणेश पाठक, मुख्य आयोजक चामू सिंह राणा व सूत्रसंचालक संजय बलोदी ‘प्रखर’ उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते डॉ बिहारीलाल जलंधरी यांनी लिहिलेल्या ‘उत्तराखंड की जनश्रुतियां’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.