03.10.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे सुरू झालेल्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन
03.10.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील जागतिक व्यापार केंद्र येथे सुरू झालेल्या चौथ्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी जागतिक व्यापार प्रदर्शनात लावलेल्या विविध देशांच्या स्टॉल्सना भेट दिली. कार्यक्रमाला खासदार रिटा बहुगुणा जोशी, ब्रिटनचे मुंबईतील उप उच्चायुक्त हरजिंदर कांग, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री, उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, जागतिक व्यापार केंद्राच्या कार्यकारी संचालिका रुपा नाईक, अनेक देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.