03.09.2023 : राज्यपालांची वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेला भेट

03.09.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेला भेट देऊन संस्थेच्या शिव शंकर सभागृहाचे उदघाटन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शिक्षण संस्थेच्या अधिनस्त अग्निहोत्री समूहाच्या संस्थांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुभाष चौधरी, गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, लोकप्रतिनिधी, शिक्षक, निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.