03.08.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत नागपूरमधील तामिळ भाषिक लोकांच्या वतीने आयोजित स्नेहमिलन संपन्न

03.08.2025: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत आज नागपूर व परिसरातील तामिळ भाषिक लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते आर.रामकृष्णन व प्रीती रामकृष्णन लिखित “भारतीय ज्ञान परंपरा” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अरुणा विजयाकुमार यांच्या गायनाने झाली. प्रतिभा नृत्य मंदिरच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम सादर केले. कांची कामकोटी पीठाचे सहनिमंत्रक जी.चंद्रशेखरन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचलन अरविंद कुमार यांनी केले तर के एस एस कृष्णन यांनी आभार मानले.