03.07.2022: इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ

03.07.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी यावेळी जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा यांच्या रथासमोरील मार्ग स्वतः झाडून रथयात्रेला रवाना केले. यावेळी इस्कॉनचे मार्गदर्शक गोपालकृष्ण गोस्वामी महाराज, डॉ सूरदास, देवकी नंदन प्रभू, रथयात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष लखमेंद्र खुराना, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल मुकुंद माधव प्रभू आदी उपस्थित होते.