03.07.2021 : राज्यपालांच्या हस्ते दृष्टीहीन मुलांना डिजिटल स्मार्ट स्टीक्स प्रदान
03.07.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १५ दृष्टीहीन मुलांना विनाअडथळा चालण्यासाठी डिजिटल स्मार्ट स्टिक्स (डिजिटल सफेत काठी) प्रदान करण्यात आल्या. वैष्णव संप्रदायाचे आचार्य गोस्वामी व्रज्रकुमारजी महाराज यांच्या उपस्थितीत मुलांना सेन्सर असलेल्या स्मार्ट स्टीक्स देण्यात आल्या. वल्लभ युथ ऑर्गनायझेशन, विश्व सिंधी सेवा संघम, लायन्स क्लब इंटरनेशनल व नयन फाउंडेशन फॉर पर्फोर्मिंग आर्ट्स यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्ल्ड सिंधी सेवा संघमचे डॉ राजू मनवाणी, परेश संघवी, गोपालदास, लायन्स क्लबचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर्स तसेच नयन फाउंडेशनच्या संस्थापिका नैना कुत्तप्पन उपस्थित होते.