03.02.2024 : राज्यपालांच्या उपस्थितीत ‘विश्व राज कपूर सिने रत्न सुवर्ण पुरस्कार’ सोहळा संपन्न
03.02.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते एमआयटी विश्व शांति केंद्र पुणे यांच्या वतीने देण्यात येणार पहिला ‘विश्व राज कपूर सिने रत्न सुवर्ण पुरस्कार’ दिवंगत अभिनेते, निर्माते दिग्दर्शक राजकपूर यांना मरणोपरांत प्रदान करण्यात आला. राजकपूर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. दिवंगत राजकपूर यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र रणधीर कपूर यांनी पुरस्कार स्वीकारत असल्याचे दृक्श्राव्य संदेशातून जाहीर केले. विश्वशांती संगीत कला अकादमीचे सचिव आदिनाथ मंगेशकर यांनी पुरस्कार स्वीकारला. पार्श्वगायक मुकेश यांचे देखील हे जन्मशताब्दी वर्ष आहे. दिवंगत मुकेश यांना देखील यावेळी मरणोपरांत सन्मानित करण्यात आले. मुकेश यांचे सुपुत्र नितीन मुकेश यांनी पुरस्कार स्वीकारत असल्याचे संदेशाच्या माध्यमातून जाहीर केले. विश्वशांती संगीत कला अकादमीचे मुख्याधिकारी डॉ मुकेश शर्मा यांनी पुरस्कार स्वीकारला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एमआयटीचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड यांचा त्यांच्या ८३ व्या वाढदिवसाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईचे माजी नगरपाल किरण शांताराम, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ मंगेश कराड, डॉ सुचित्रा कराड चाटे, ज्योती कराड ढाकणे आदी उपस्थित होते.