03.02.2021: राज्यपाल यांच्या हस्ते देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे नुतनीकरण समारंभ संपन्न
03.02.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सटाणा जि. नाशिक येथे देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारक नुतनीकरण कार्याचा भुमिपूजन शुभारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, खा. डॉ. सुभाष भामरे, दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.