02.12.2023 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
![छायाचित्र उपलब्ध नाही](https://img.youtube.com/vi/H6ZGLgJ96nM/mqdefault.jpg)
02.12.2023 : आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर येथे संपन्न झाला. दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे कुलपती तसेच राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुभाष चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डी.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. या दीक्षांत समारंभात १२९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे, तर एकूण ७९,४४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.