02.06.2023: राजभवन येथे प्रथमच ‘तेलंगणा राज्य दिवस साजरा

02.06.2023: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे ‘तेलंगणा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तेलंगणाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘जय जय हे तेलंगणा’, ‘बतकम्मा’, ‘बोनालू’ व ‘ओग्गु डोलू’ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तेलंगणा शासनाच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाला तेलुगू अभिनेते हरीश कुमार यांसह तेलंगणा समाजातील श्रीनिवास सुलगे, अशोक कांटे, पोटटू राजाराम, जगन बाबू गंजी आदी उपस्थित होते.