02.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल संस्कृती पुरस्कार प्रदान
02.06.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथे विविध क्षेत्रातील ८ व्यक्तींना वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्कृती शिक्षण समूह संस्थेतर्फे भुकूम पुणे येथील संस्थेच्या शैक्षणिक परिसरात आयोजित सत्कार सोहळ्यात जहांगीर हॉस्पिटलचे मुख्याधिकारी जहांगीर एच सी जहांगीर, लेखिका नमिता गोखले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले, शिक्षण तज्ज्ञ कमला इडगुंजी, मिरर नाऊचे सहयोगी संपादक मंदार फणसे, सकाळचे डिजिटल माध्यम संपादक सम्राट फडणीस, दिव्यांग ऑलिम्पिकपटू प्रियेशा देशमुख यांना संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी एनडीएचे कमांडंट व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, संस्कृती समूहाच्या संस्थापिका देवयानी मुंगली व सहसंस्थापक कर्नल (नि.) गिरीजा शंकर मुंगली, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.