02.03.2022: तर्पण पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते स्वावलंबी युवक युवती सन्मानित
02.03.2022: अनाथ असून देखील जीवनात चांगले शिक्षण प्राप्त करून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या ५ युवक युवतींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तर्पण युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे, तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय व पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.