02.02.2025: ब्रिटनचे ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी घेतली राज्यपालांची भेट

02.02.2025: मुंबई भेटीवर असलेल्या ब्रिटनचे ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड हे राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात कनिष्ठ सुपुत्र असून राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू आहेत. बैठकीला ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खाजगी सचिव अॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल उपस्थित होते.