02.02.2021 : राज्याची उंचावली मान : राज्यपालांकडून एनसीसी कॅडेटसचा सन्मान
02.02.2021 : विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण उपस्थित राहत असलेल्या दीक्षांत समारंभांमध्ये बहुतांशी सुवर्ण पदके महिला विद्यार्थिनी जिंकत असतात. एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये राज्याच्या दहापैकी दहाही महिला कॅडेटसची प्रतिष्ठेच्या संचलनासाठी झालेली निवड झाली ही तितकीच अभिमानास्पद कामगिरी असल्याचे सांगून महिलांच्या कामगिरीचा सर्वच क्षेत्रांमध्ये उंचावणारा आलेख देशाकरिता शुभ लक्षण आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलले.