02.01.2026: राज्यपालांनी सकाळच्या नाश्त्याच्यावेळी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
02.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत याांनी पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी सकाळच्या नाश्त्याच्यावेळी त्यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा आदी उपस्थित होते.