02.01.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा

02.01.2025: महाराष्ट्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, मुंबई पोलीस सशस्त्र दल पथक, मुंबई पोलीस महिला पथक, ठाणे शहर- लोहमार्ग पोलीस पथक, मुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक तसेच निशाण टोळी व बँड पथक सहभागी झाले होते. यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.