02.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस वर्धापन दिन साजरा
02.01.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. यावेळी राज्याच्या पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर, तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.