01.12.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव साजरा
01.12.2025 : गीता जयंती निमित्त वेदश्री तपोवन, मोशी, आळंदी येथे आयोजित गीता जयंती महोत्सव महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महोत्सवाचे आयोजन वेदश्री तपोवन कार्य समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, संत ज्ञानेश्वर गुरुकुल, गीता परिवार, श्री कृष्ण सेवा निधी यांनी संयुक्तपणे केले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शांतीब्रम्ह ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर यांना संत ज्ञानेश्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री चिलकूर बालाजी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, हैदराबादचे विश्वस्त सी. एस. रंगनाथन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार देण्यात आला. डॉ. मुकुंद दातार यांना समाज सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला अयोध्या येथील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, गीता जयंती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभय भुतडा, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी आदी उपस्थित होते. वेद केवळ भारतीयांचाच नव्हे तर विश्वाचा महान वारसा आहे. वेदांचा सार उपनिषदे असून उपनिषदांचा सार गीता आहे, असे राज्यपालांनी सांगितले.