01.12.2024 : राजभवन येथे नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस साजरा
01.12.2024 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन एसएनडीटी महिला विद्यापीठ व ‘ईश्वरपूरम पुणे’ या उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले. यावेळी ‘ईश्वरपूरम’ संस्थेतील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लोकगीत सादर केले. राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित विद्यार्थी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.