01.12.2023: राष्ट्रपतींनी सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय, पुणेला प्रेसिडेंट्स कलर हा सन्मान देऊन गौरवले
01.12.2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला प्रेसिडेंट्स कलर हा सन्मान देऊन गौरवले. यावेळी त्यांनी आभासी पद्धतीने ‘प्रज्ञा’ या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषध उपचार केंद्राचे उद्घाटन देखील केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक आणि आर्मी मेडिकल कॉर्पस् चे वरीष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, एएफएमसीचे संचालक तथा कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल यांच्यासह संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.