01.11.2020: राज्यपालांच्या हस्ते प्रशांत दामले, सुभाष घई यांसह ४५ करोना योद्ध्यांचा सन्मान

01.11.2020: करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले तसेच निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात करोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या करोना योद्ध्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.