01.10.2021 : राज्यपालांच्या हस्ते ‘ऑल इज वेल: मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच या पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन
01.10.2021: युवा लेखक व पत्रकार संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान येथे झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार व लेखक संदीप काळे उपस्थित होते.