01.09.2023: उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘महेंद्रगिरी’ या नौदलाच्या युद्धनौकेचे माझगाव गोदी येथे जलावतरण

01.09.2023: उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज ‘महेंद्रगिरी’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे माझगाव गोदी येथे जलावतरण करण्यात आले.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माझगाव गोदीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.