01.08.2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान

01.08.2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुणे येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ दीपक टिळक व इतर मान्यवर उपस्थित होते.