01.06.2026:- राज्यपालांच्या उपस्थितीत लोक भवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न
01.06.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र लोक भवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते लोकनृत्यासह सादर केली. विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते.