01.05.2026 : राज्यपालांचे भाषण : ‘१८ वा न्यूजमेकर्स अचिव्हर्स’ पुरस्कार सोहळा
01.05.2026 : ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, गझल व पार्श्वगायक हरिहरन, ख्यातनाम शेफ संजीव कपूर, अभिनेत्री सुषमा देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे तसेच बीड जिल्ह्यात एचआयव्ही/एड्सग्रस्त बालकांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले समाजसेवक दत्ता बरगजे आणि संध्या बरगजे यांना आज ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार राज्यपाल श्री जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले. आफ्टरनून व्हॉईसतर्फे आयोजित ‘१८वा न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स’ सोहळ्यास प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा, अभिनेते व जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ भरत दाभोळकर, आफ्टरनून व्हॉईसच्या संपादक डॉ. वैदेही तामण तसेच राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.