01.05.2025: राज्यपालांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला

01.05.2025: महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत उपस्थित होते.