01.05.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र दिन साजरा
01.05.2024: राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे ६५ व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला. यावेळी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.