01.05.2022 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी संचलनाचे निरीक्षण केले तसेच राज्यातील नागरिकांना मराठीतून संबोधित केले. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.