01.04.2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे रवाना
                                                01.04.2025: रिझर्व्ह बँकेचा ९० वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीकडे रवाना झाल्या. विमानतळावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला.