01.04.2022: पालघर व कुलाबा येथील विद्यार्थ्यांसह राज्यपालांनी ऐकली ‘परीक्षा पे चर्चा’

01.04.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पालघर व कुलाबा येथून आलेल्या विद्यार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम राजभवन मुंबई येथुन पाहिला. यावेळी जवाहर नवोदय विद्यालय पालघर व केंद्रीय विद्यालय कुलाबा मुंबई येथील ९ वी ते १२ वी या वर्गांमधील विद्यार्थी राजभवन येथे उपस्थित होते.