01.02.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस

01.02.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह, भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए. के. हरबोला, तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा तसेच भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले.