01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी साधला पिंपरखेडच्या चावडीवर ग्रामस्थांशी संवाद
01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज रात्री दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिराजवळील चावडीवर ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती, गो पालनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नाशिक अर्पिता ठुबे, कळवणच्या काश्मिरा संखे, प्रांताधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, सरपंच सोनाली मोरे आदी उपस्थित होते.