01.01.2026: राज्यपालांची नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावास भेट
01.01.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड गावी मुक्कासाठी आगमन झाले. सायंकाळी गावात प्रवेश केल्यावर राज्यपालांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक आदिवासी नृत्य, लहान मुलांचे लेझीम नृत्य, टाळ, मृदुंगाचा ध्वनी आणि गावकऱ्यांचा उत्साह पाहून राज्यपाल भारावले. पिंपरखेड गावी राज्यपालांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आदी उपस्थित होते. रासायनिक खतांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळेच नैसर्गिक शेतीचा मी आग्रह धरतो. माझ्या शेतात ८ प्रजातींच्या ४५० गायी आहेत. त्यातील ६ प्रजाती भारतीय आहेत, असेही ते म्हणाले. राज्यपाल महोदयांनी गावात मुक्काम करणार असल्याचे सांगताच गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.