२९.०६.२०२६: राज्यपालांच्या हस्ते युगप्रवर्तक डॉ हेडगेवार या नाट्याच्या ५१ व्या प्रयोगाचे उदघाटन
२९.०६.२०२६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘युगप्रवर्तक डॉ हेडगेवार’ या भव्य नाट्याच्या ५१ व्या प्रयोगाचा उदघाटन सोहळा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, नादब्रह्म फाउंडेशनचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर, रास्व संघाचे मुंबई महानगर सहसंघचालक डॉ विष्णू वझे, हावरे बिल्डर्सचे डॉ सुरेश हावरे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, समन्वयक सुमेध चव्हाण व गौरव फुखर आदी उपस्थित होते.