१६ .०८.२०२१: राज्यपालांनी सिंहगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवल्या
१६ .०८.२०२१: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज चालत जाऊन प्रसिद्ध सिंहगड किल्ल्याला (कोंढाणा) भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवल्या. गेल्यावर्षी याच दिवशी राज्यपालांनी शिवनेरी किल्ला सर केला होता. राज्यपालांनी सिंहगडावर लोकमान्य टिळक यांचे निवासस्थान, नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी तसेच राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाला भेट दिली व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.