०१.०२.२०२३: राज्यपालांच्या हस्ते महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयोजित तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उदघाटन
०१.०२.२०२३: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या नव तेजस्विनी ‘जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम’ या उपक्रमांतर्गत आयोजित तीन दिवसांच्या कार्यशाळेचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत आयफॅड व माविममध्ये सहकार्य कराराचे आदानप्रदान करण्यात आले.
उदघाटनाला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या (आयफॅड) प्रधान तांत्रिक विशेषज्ञ एंडाया बेलचिका, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इदझेस कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका रुबल अगरवाल, आयफॅडच्या राज्य समन्वयक मीरा मिश्रा, तसेच महिला बचत गटाच्या सदस्य व माविमचे अधिकारी उपस्थित होते.