राज्यपालांचे भाषण – 19.11.2025: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले
19.11.2025: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला . कार्यक्रमाला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती आदी उपस्थित होते. विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांच्या हस्ते जिल्ह्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्या मंगेश भास्कर, दत्तात्रय निगडे, रामदास लांडगे, अनिल पायगुडे व लहू फाले या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला.