३१.०१.२०२० डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचे उद्घाटन राज्यपालांनी केले

३१.०१.२०२० दखनी अदब फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिवल’ या काव्य, संगीत व कला महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तसेच पुण्याचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, साखर आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक विशाल भारद्वाज, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, आदि मान्यवर उपस्थित होते. मोनिका सिंह यांच्या ‘सहर के ख्वाब’ या हिन्दी काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.