माध्यान्ह भोजन योजनेचे जालना येथे लोकार्पण
05.02.2020: महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी लि. व अन्नामृत फाऊंडेशन यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या माध्यान्ह भोजन योजनेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते जालना येथे झाले. यावेळी महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, अन्नामृत फाऊंडेशनचे राधाकृष्ण दास, महिको मॉन्सेन्टो कंपनीचे आशिया खंड विभागाचे प्रमुख सिमोन थोरस्टेड विबुस्च, आमदार हरिभाऊ बागडे, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, नगरध्यक्षा संगीता गोरंट्याल आदी उपस्थित होते.