१५.०१.२०२० उत्तराखंड भवनचे नवी मुंबई येथे उद्घाटन
१५.०१.२०२० वाशी नवी मुंबई येथे उत्तराखंड शासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या ‘उत्तराखंड भवन‘ अतिथीगृह व एम्पोरियमचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भागतसिंह कोश्यारी व उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला उत्तराखंडच्या मंत्री रेखा आर्य, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, उद्योजक के.एस. पंवार यांसह उत्तराखंडचे अनेक लोकप्रतिनिधी व निमंत्रित उपस्थित होते.
.