भाषण :- 30.05.2023: राजभवन येथे प्रथमच गोवा राज्य स्थापना दिवस साजरा

30.05.2023: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत ‘गोवा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे ‘गोवा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजित कडकडे, गायिका देवकी पंडित, पार्श्वगायक सुदेश भोसले, समाजसेविका डॉ आर्मिडा फर्नांडिस, सुमन रमेश तुलसियानी (यांच्या वतीने शरद कुवेलकर), अशांक देसाई, शेफ दीपा सुहास अवचट तसेच ‘आमी गोयंकार’ संस्थेचे अध्यक्ष मोहन संझगिरी यांचा सत्कार करण्यात आला.