भाषण 15.09.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कार प्रदान
15.09.2023: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक व हिमालयाचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावर्षीचा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ या संस्थेला देण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अजित राणे, नितीन पाटोळे व संतोष हसूरकर यांनी पुरस्कार स्वीकारला.