भाषण- 07.08.2024: राज्यपालांच्या हस्ते योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
07.08.2024: ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावरील चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, समाजसेवक पद्मश्री श्री शंकरबाबा पापळकर, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, लेखक द्वय डॉ प्रदीप ढवळ आणि डॉ अरुंधती भालेराव तसेच निमंत्रित उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्याचे आयोजन कोकण मराठी परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांनी संयुक्त विद्यमानाने केले होते.