भाषण :- 06.09.2024: राज्यपालांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयासमोर वृषभ (बुल) व सामान्य लोक दर्शवणारया शिल्पाकृतीचे अनावरण केले

06.09.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयासमोर वृषभ (बुल) व सामान्य लोक दर्शवणारया शिल्पाकृतीचे अनावरण केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्मितीपासून इतिहास सांगणाऱ्या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, डीआरचोकसी फिनसर्वचे व्यवस्थापकीय संचालक देवेन चोकसी तसेच गुंतवणूकदार व एनएसईचे अधिकारी उपस्थित होते.