भाषण 03.05.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान
03.05.2023: विश्व संवाद केंद्र मुंबईच्या वतीने देण्यात येणारे २२ वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आले. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक डिजिटल व समाज माध्यम क्षेत्रातील १० पत्रकारांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बालकृष्ण उर्फ प्रमोद कोनकर. दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, निलेश खरे, जयंती वागधरे, यूट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर यांना पुरस्कार देण्यात आले. यावेळी विश्व संवाद केंद्र मुंबईचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, विश्वस्त निशिथ भांडारकर, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.